ब्रेकिंग न्यूज

महायुतीचं सरकार राज्याला विकासाकडे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महायुतीचं सरकार राज्याला विकासाकडे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज धुळ्यात शासन आपल्या दारी या उपक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. विकासाला साथ देण्यासाठी शिवसेना-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतीसाठी पाणी, पिण्याचं पाणी हे प्रश्न सोडवायचे आहेत असं पवार यावेळी म्हणाले. पश्चिमेचं पाणी पूर्वेला आणण्यासाठी करोडो खर्च झाले तरी चालतील पण शेतीला  पाणी मिळायला हवं असं ते म्हणाले. 

रायगड जिल्ह्यात कुलाबा इथं आज महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली, या परिषदेलाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. पोलीस, रुग्णवाहिका सेवा देणारे आणि अग्निशमन दल यांनी योग्य समन्वय साधला तर अधिक प्रभावीपणे काम करता येणे शक्य होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक आहेत, पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातल्या पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारी पोलीस ठाणे आणि अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं.

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: