ब्रेकिंग न्यूज

महायुतीचे २०० पेक्षा जास्त आमदार व ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार -उदय सामंत यांना विश्वास

कुणी कितीही दौरे केले आणि आदळाआपट केली तरी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक आमदार निवडून येतील, असा ठोस विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. आमच्यावर, आमच्या नेतृत्वावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी सुरु ठेवला असून त्यांची ही अस्तित्वाची लढाई आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असंही ते म्हणाले. आम्ही जनतेशी आणि जनतेच्या विकासाशी बांधील आहोत, असंही त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होतील, असंही ते म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: