ब्रेकिंग न्यूज

शिवसेना हे पक्षाचं नाव कुठेही जाऊ देणार नाही असा उद्धव ठाकरे यांचा निर्धार

शिवसेना हे आपल्या पक्षाचं नाव असून आपण ते कुठेही जाऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली.लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याच्या हक्त मतदारांना मिळावा, या विषयावर चर्चा होण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपा पक्षफोडीचं नव्हे तर पक्षचोरीचं राजकारण करत आहे, याकरता भाजपानं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे, असा आरोप, त्यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. आपल्यावर घरी बसून राहल्याची टीका सगळेजण करतात, मात्र आपण घरी बसलो होतो, कुणाची घरं फोडली नाहीत, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं काही महिन्यांपूर्वी दिला. त्याला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्या याचिकेवर येत्या ३१ जुलैला सुनावणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगासमोर सगळ्या पुराव्यांची आकडेवारी समोर ठेवू, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. आमदार अपात्रतेच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं.

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: