कथा-कविता-साहित्यमहिला जगत

मुलींच शिक्षण आणि नोकरी : न बसणारा मेळ

लेखिका- आरती कुलकर्णी (रत्नागिरी)

ठळक बातमी:अफगाणिस्तानात शिक्षण, नोकरी नंतर ब्युटीपार्लर वर बंदी. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींच्या अधिकारावर, स्वातंत्र्यावर हे नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत.यापूर्वी शिक्षण आणि बहुतांश नोकऱ्या करण्यावर बंदी घालण्यात आली होती.अनेक महिलांच्या रोजगारावर गदा आली आहे.

वरील बातमी वाचली आणि मुलींचं शिक्षण, नोकरी, करियर असे अनेक विषय डोळ्यांसमोर येवु लागले. म्हणून त्याबद्दल थोडं लिहावस वाटल.

आज आपण शिक्षणाच्या बाबतीत मात्र खुप समाधानी आहोत. हल्लीच्या मुली खुप शिकत आहेत उच्च शिक्षण घेत आहेत. प्रगती करत आहेत.पण इतकं शिक्षण घेवुन ही कधी कधी नोकरीच्या बाबतील थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांच्यावर मर्यादा येतात.

माझ्या अगदी खास मैत्रिणीच्या मुलीनं नुकतंच एमएससी पुर्ण केलं आहे. तिचं स्वप्न आहे की मुंबईला जावून एखादा चांगला कोर्स करायचा आणि नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ राहायच. पण घरातले यासाठी तयार नाहीत. आजकालची परिस्थिती बघता, इतक्या लांब एकट्या मुलीनं राहणं त्यांना योग्य वाटत नाही. शिवाय लोकल चा प्रवास तिला झेपणार नाही. तिला त्रास होईल वगैरे वगैरे. आता पुढं काय करायचं? हा प्रश्न आहे.

ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. पण आजूबाजूचा समाज म्हणा किंवा घरातले म्हणा , तीनं आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनावे, नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनावे याबाबतीत उदासीन दिसून येतात. पुढं जावून लग्नच करायचं नवरा, मुल व घरच सांभाळायचं मग कशाला अभ्यास करायचा आणि कशाला हवी ती नोकरी? ही मानसिकता अजुनही दिसुन येते. खेड्यामध्ये बऱ्याच सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. म्हणजे तिन नोकरी करायची ठरवली तर त्या वेळेत बस म्हणा किंवा अन्य काही वाहतूक साधन तिला उपलब्ध होतीलच अस नाही. हि एक बाब तिच्या नोकरीसाठी अडथळा ठरते.

माझ्या एका ओळखीच्या काकूंच्या मुलाच नुकतंच लग्न ठरलय. सधन कुटुंब.मुलगा खुप शिकलेला आहे.चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. हुशार, दिसायला सुंदर. सगळे सुशिक्षित. अडचणी येण्याचा प्रश्नच नव्हता .मुलगी पण खुप शिकलेली आहे.. नोकरी करणारी आहे. पण तिचं नोकरी करण्याचं ठिकाण घरापासून खुप लांब असल्यामुळं, येण्या जाण्यात खुप वेळ जाईल . शिवाय तिला जो प्रवासाचा त्रास होईल तो वेगळाच. त्यामुळे ही नोकरी तिन continue करू नये असे सर्वानुमते ठरले होत.

काही ठिकाणी तर शिकलेली मुलगी सुन म्हणुन हवी आहे .पण नोकरी करणारी नको.घरच सगळ चांगल असताना म्हणजे आर्थिक सुबत्ता असताना मुलींनी नोकरी करायची काय गरज आहे? तिन प्रथम घराकडे लक्ष द्यावं . नवऱ्याची, मुलांची जबाबदारी घ्यावी. असं वाटतं. थोडक्यात काय लग्नानंतर झालेलं स्थलांतर, घरातली जबाबदारी,न झेपणारा प्रवास , अचानक आलेलं एखादं आजारपण, अशक्तपणा अशी बरीच कारणं मुलींच्या नोकरी साठी अडचणीची ठरतात. अशावेळी मुलींना वाटतं इतकं शिक्षण घेवुन काय उपयोग ?आपल्या नावापुढे 4-5 पदव्या लागल्या इतकंच.

पण एक मात्र नक्की जेव्हा घरातल्यांचा तिला पाठिंबा असतो ना तर ती काहीही करु शकते.

आजूबाजूला मी अशा अनेक महिला बघते की, कुटुंब आणि,नोकरी अशा दोन जबाबदाऱ्या त्या यशस्वीपणे पार पाडते. घरात नवऱ्याची,सासूची, मुलांची मन सांभाळायचं आणि ऑफिस मध्ये बॉसचं काम सांभाळायचं. हा balance ती कशी सांभाळते हे तिलाच ठाउक.कोणतेही हाती घेतलेलं काम असुदे ते अगदी आत्मीयतेने आणि अचुक करून दाखवते.याबद्दल शंकाच नाही.कोणत्याही बिकट प्रसंगी न डगमगता आहे त्या परिस्थितीशी दोन हात करण्याची हातोटी , एकमेकांना समजून घेण्याची वृत्त्ती.स्किल वापरून नवनवीन प्रयोग करण्याची तिची धडपड, टीम management, अर्थकारण, मार्केटिंग अशा अनेक उपजत गुणाच्या पायावर तर ती ऊभी असते. बस कंडक्टर, पायलट किंवा एखाद्या पोलिस खात्यातील बाई बघा पुरुषा सारखे तडफेने काम करत असते. आणि हे सगळं करताना घराकड तिचं मुळीच लक्ष नसत असं काही नाही.आपली नोकरी घरासाठी आहे याची तिला जाणीव असते. नोकरी करून घरी येताना रेल्वे च्या डब्यात बसल्या बसल्या भाजी निवडणा ऱ्या बायका मी बघितल्या आहेत. नोकरी करून भरभक्कम पगार मिळवणं एवढंच उदिष्ट नसतं आर्थिक दृष्ट्या सक्षम तर ती बनतेच पण ती एक स्वतःच विश्व निर्माण करते आपलं अस्तित्व निर्माण करते. स्वतः मानान उभी राहते.

मैत्रिणींनो,स्वतःला आणखी सक्षम बनवण्यासाठी सतत काहींना काही शिकत रहा.तुमच्यात असलेल्या कला गुणांना वाव द्या. छंद जोपासा. थोडा वेळ स्वतःसाठी जगा

Back to top button
error: Content is protected !!
%d bloggers like this: